ताज्या घडामोडी
सुरेंद्र म्हात्रे रायगड जिल्हाध्यक्ष शिवसेना ठाकरे यांचा चौल ते आग्राव रस्ता खराब झाल्याने कार्यकारी अभियंता(महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था) यांना आंदोलनाचा इशारा
अलिबाग-प्रतिनिधी

माननीय सुरेंद्र दादा म्हात्रे जिल्हाध्यक्ष-ठाकरे गट (रायगड) यांनी ५/०६/२०२३ रोजी कार्यकारी अभियंता (महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था रायगड) यांना चौल ते आग्राव रस्ता खराब झाला असल्याकारणाने पत्रव्यवहार केलेला आहे गेली कित्येक वर्ष चौल ते आग्राव रस्ता हा अतिशय जीर्ण अवस्थेत आहे आणि त्या संदर्भात भरपूर लोकांनी आवाज उठवून मागील वर्षी तो रस्ता बनवला गेला परंतु रस्ता चालू असतानाच तेथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल संशय व्यक्त केला होता परंतु कोणीही ऐकलं नाही मी सुद्धा त्या संदर्भातल्या बातम्या वारंवार माझ्या चॅनेलच्या माध्यमातून लावलेल्या आपण पाहिलेल्या असतील सुरेंद्र म्हात्रे यांनी आपल्या निवेदनात काय म्हटले आहे ते तुम्ही पहिल्यांदा वाचा
जर चौल ते आग्राव रस्ता तात्काळ चांगला केला गेला नाही तर १२/०६/२०२३ रोजी तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा सुरेंद्र म्हात्रे यांनी कार्यकारी अभियंता (महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था) यांना दिला आहे २१ व्या शतकात आणि २०२३ मध्ये पण अलिबाग मधील जनतेला ग्रामीण पक्के रस्ते नाही यापेक्षा अजून काय शोकाकिंका असेल. (अतिश गायकवाड)