ताज्या घडामोडी
किशोर काजारे माजी सरपंच ग्रापंचायत वळके-मुरुड यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश
अलिबाग-रायगड

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील वळके ग्रामपंचायतीचे पाच वर्ष सरपंच पद भूषवलेले किशोर काजारे यांचा आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात आज पक्षप्रवेश झाला आहे सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून आपल्या पक्षात सामावून घेतले आहे
काही महिन्यांपूर्वी वळके ग्रामपंचायतीची मुदत संपलेली होती हे आपल्याला माहित आहे सध्या जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या वर्षात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत यामध्ये वळके ग्रामपंचायत सुद्धा समाविष्ट आहे. म्हणून ऐन निवडणुकीच्या तोंडावर किशोर काजारे यांनी उ.बा.ठा पक्षात प्रवेश केल्यामुळे निश्चितच शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार आहे
मागील महिन्यात किशोर काजारे यांनी फेसबुक लाईव्ह करून मी उ.बा.ठा.पक्षात जाईन असं जाहीरपणे सांगितलेलं होतं येणाऱ्या कार्यकाळात लवकरच त्यांचा उ.बा.ठा.मध्ये पक्षप्रवेश आपल्याला पाहायला मिळणार होता परंतु गेले कित्येक दिवस त्यांचा प्रवेश लांबणीवर चालला होता परंतु आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी त्यांचा अधिकारीकरित्या उ.बा.ठा. पक्षात प्रवेश झालेला आपल्याला दिसला
आपण पाहिलं असेल अलिबाग-मुरुड मतदार संघातील शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या सत्तेतील पक्षात प्रवेश न करता किशोर काजारे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात का प्रवेश केला?हा सर्व राजकारण्यांसाठी आत्मचिंतनाचा विषय आहे आपण बघितलंत मागील वर्षी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून 40 आमदारांसह BJP सोबत जाऊन सत्ता स्थापन केली आणि शिवसेना हा माझाच पक्ष आहे असा दावा केला आणि त्यानुसार शिंदे गट आणि ठाकरे गट असे शिवसेनेचे दोन तुकडे झाले असे असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे एकनाथ शिंदे यांचे आहे अशा पद्धतीचा निर्णय दिला आणि शिवसेना शिंदे यांची झाली असे असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे फक्त चौदा,पंधरा आमदार असताना अशा पक्षांमध्ये प्रवेश करणे म्हणजे किशोर काजारे यांचं काळीज वाघाचं आहे असंच म्हणावं लागेल कारण एकंदरीत जो पक्ष सत्तेमध्ये नाही ज्या पक्षाचे नाव आणि चिन्ह हे जे कोणी एक सत्तेतील आमदार यांना मिळालं असताना त्या पक्षात प्रवेश न करता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश का केला हा सर्वांना पडणारा प्रश्न आहे
किशोर काजारे यांनी जो पक्ष प्रवेश केला त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र दादा म्हात्रे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे शिवसेनेचे निष्ठावंत असलेले कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे सत्तेत नसताना सुद्धा रायगड मधून भरपूर प्रवेश त्यांच्या माध्यमातून उध्दव बाळासाहेब ठाकरे गटांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत हे विसरून जाता कामा नाही