कर्नाला बँक घोटाळा प्रकरणी विवेक पाटील यांची 152 कोटींची मालमत्ता जप्त
कर्नाला बँक घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले बँकेचे अध्यक्ष शेकापचे माजी आमदार विवेक पाटील (उरण) यांच्या सुमारे 152 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे
कर्नाला बँकेत तब्बल 540 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते या संदर्भात सर्वप्रथम भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी कर्नाला बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून आवाज उठवला तसेच या बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना अटक करून न्याय मिळावा यासाठी विविध यंत्रणांकडे पाठपुरावा केला होता
ईडीने गुरुवार दिनांक 12 रोजी कारवाई करीत विवेक पाटील त्यांचे नातेवाईक आणि कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची विस्तिर्ण जमीन,बंगला,निवासी संकुल इत्यादी स्वरूपातील मालकीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे ज्याचे मूल्य सुमारे 152 कोटी आहे तरी या प्रकरणात एकूण जोडणी अंदाजे 386 कोटी रुपये आहे
Back to top button
Don`t copy text!