ताज्या घडामोडी
आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त कलारंग आयोजित महानाट्य स्पर्धेत भोनंग गावातील उसन्या बायकोची वरात लग्नाची या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला
अलिबाग-रायगड

अलिबाग मुरुड मतदार संघाचे दमदार आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग मध्ये पहिल्यांदाच कलारंग आयोजित.आमदार महानाट्य करंडक स्पर्धा 2025 ही दोन अंकी नाट्य स्पर्धा आयोजित केली होत.या स्पर्धेमध्ये जवळपास नऊ नाटकांनी सहभाग घेतला होता.ही स्पर्धा दिनांक 11 मे पासून ते 15 मे पर्यंत चालली.या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रोख रक्कम 55 हजार रुपये आणि भव्य असे चषक.द्वितीय क्रमांक 35 हजार रुपये आणि भव्य चषक तसेच उत्तेजनार्थ दुसरा यासाठी 21000 रुपयांच पारितोषिक आणि भव्य चषक तर उत्तेजनार्थ पहिला यासाठी सुद्धा 21000 रुपये आणि भव्य चषक असे पारितोषिक होते.ही स्पर्धा परीक्षक अभिनेते दिग्दर्शक अनिल गवस व भरत सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणि काटे की टक्कर असलेल्या या लढतीमध्ये अलिबाग मधील भोनंग गावातील जय हनुमान नाट्य मंडळ भोनंग. उसन्या बायकोची वरात लग्नाची या नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.नाटकामध्ये शेखर काशिनाथ झावरे,नवनाथ शेळके,नितेश शेळके,जीवन झावरे,रत्नाकर खारकर,संकेत ठाकूर,तुषार पाटील निर्भय भोपी,कांचन मोहिरे,काशिनाथ शेळके या सर्व कलाकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.या स्पर्धेला चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम सुद्धा उपस्थित होते
उसन्या बायकोची वरात लग्नाची या नाटकात शेखर झावरे यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार पटकावला ते रोख रक्कम ५००० आणि चषकाचे मानकरी ठरले