मुरुड तालुक्यात १५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत 20 ऑक्टोबर रोजी निवडणूक फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता परंतु मुरुड तालुक्यातील वीहुर ग्रामपंचायत हद्दीत सरपंच पदासाठी ST आरक्षण पडले असता इंडिया आघाडीकडून एकच उमेदवारी अर्ज गेल्यामुळे विहुर ग्रामपंचायत सरपंचपदी रेश्मा तपेसर यांची बिनविरोध निवड झाली आहे तसेच दोन सदस्य यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे म्हणून शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना मोठा धक्का बसला आहे
शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना उमेदवार का मिळाला नसेल?
मागील दोन वर्षापूर्वी विहूर गावांमध्ये मुस्लिम लोकवस्तीच्या समोर समुद्रकिनारी लागून एक भव्य मैदान आहे तेथे विभागातील स्थानिक तरुण क्रिकेटचे सामने खेळत असत परंतु ती जमीन एका बिल्डरला आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून विकली गेली आहे असा आरोप तेथील ग्रामस्थ वारंवार करीत आहेत म्हणून त्याचा फटका नक्कीच आमदार महेंद्र दळवी यांना बसला आहे
सद्या देशामध्ये विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे त्याची अंमलबजावणी ग्रामीण पातळीवर सुद्धा पाहायला मिळत आहे मुरुड तालुक्यातील विहुर ग्रामपंचायतीतील हा विजय इंडिया आघाडीचा पहिला विजय आहे अस विरोधकांचे म्हणन आहे
इंडिया आघाडी 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार महेंद्र दळवींची डोकेदुखी ठरू शकते?
2024 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आहेत इंडिया आघाडीला लोकांचा वाढता प्रतिसाद आमदार महेंद्र दळवी यांना नक्कीच चिंतेत टाकणारा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपात्रतेची टांगती तलवार आमदार पदावर असताना इंडिया आघाडीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे दळवींना 2024 मध्ये आमदार होणे अतिशय कठीण झाले आहे
Back to top button
Don`t copy text!