कुर्डूस ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या छाया पिंगळे यांची कुर्डूस येथे गट नंबर 191 ही मालकीची जागा आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जागेत त्यांना विचारात न घेता मौजे नवखार ग्रामपंचायत कुर्डूस हद्दीत स्मशानभूमी बांधली आहे त्याबाबत त्यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर आपले म्हणणे मांडले होते
छाया पिंगळे यांच्या जागेत स्मशानभूमी बांधल्यानंतर त्यांच्या जागेतून डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत सन 2024 ते 25 या वर्षात माननीय आमदार महोदय यांनी शिफारस केलेल्या मौजे नवखार ग्रामपंचायत कुर्डूस तालुका अलिबाग येथील स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत सौ छाया पिंगळे यांनी 30/8/2024 रोजी जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय यांना तक्रार अर्ज केला होता त्यामध्ये सदरचा रस्ता हा गट क्रमांक 191 या खाजगी मालकीच्या जागेतून जात असल्याचे नमूद केलेले होते

त्यानुसार जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहेत्रे यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांना सदर कामाबाबत सद्यस्थितीचा अहवाल जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांना सादर करायला सांगितलेला आहे
Back to top button
Don`t copy text!