
रायगड प्रतिनिधी
थळ (अलिबाग) RCF कंपनी येथे खत निर्मितीचा प्रकल्प गेली कित्येक वर्ष कार्यरत आहे.सध्या कंपनी मध्ये नवीन प्रकल्प येत आहे.परंतु RCF कंपनी मध्ये १४१ प्रकल्प ग्रस्तांना आजतागायत नोकरी मिळाली नाही आहे.नवीन प्रकल्प आल्यामुळे आपल्याला नोकरी मिळेल अशी आशा प्रकल्पग्रस्त यांना आहे यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
नवीन प्रकल्पाची जनसुनावणी ह्या अगोदर १५ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित केली होती पण या जनसुनावणीला प्रशासनाचा एकही सक्षम अधिकारी हजर राहिला नव्हता म्हणून ती जनसुनावणी बारगळली.आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी चोंढी साई इन रिसॉर्टमध्ये जनसुनावणी होणार आहे.
आजच्या RCF मधील नवीन प्रकल्पाच्या जनसुनावणी मध्ये स्थानिक प्रकल्प ग्रस्त,मच्छीमार काय भूमिका घेतात.ह्याच्यावर कंपनीच्या नवीन प्रकल्पाचे धोरण ठरणार आहे.