ताज्या घडामोडी

उमटे धरणाच्या गाळासंबंधी आज दि.9 मे रोजी वावे येथील राम मंदिरामध्ये विभागातील ग्रामस्थांची बैठक

अलिबाग-रायगड

आज दिनांक 9 मे रोजी उमटे धरणाच्या गाळासंबंधी बैठक वावे गावातील राम मंदिर येथे आयोजित करण्यात आलेली आहे

1978 च्या दशकात अलिबाग तालुक्यात उमटे धरण शासनाकडून बांधले गेलेले होते त्या गोष्टीला आता जवळजवळ 40 वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे एकेकाळी संपूर्ण अलिबाग तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उमटे धरणातून आज 2024 मध्ये दिवसातून दोन-तीन दिवस आड पाणी नागरिकांना मिळत आहे त्याच्यामुळे धरणातील पाणी पिणारे नागरिक प्रचंड संतप्त झालेले आहेत गेले 40 ते 42 वर्ष उमटे धरणातून गाळ न काढल्यामुळे उमटे धरण हे संपूर्णपणे मातीने भरलेले आहे त्याच्यामुळे उमटे धरणाची पाणीसाठा करण्याची मर्यादा ही कमी झालेली आहे त्याच्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत आज उमटे धरणातून सुडकोली,रामराज,बोरघर,बेलोशी,चौल,रेवदंडा,नागाव आणि आक्षी या ग्रामपंचायत हद्दीतील लोकांना पाणीपुरवठा होतो परंतु आज मे महिन्यामध्ये चाकरमानी मुंबईवरून त्यांच्या मुलाबाळांना सुट्ट्या पडल्यामुळे गावाला आलेला आहे आणि दोन-तीन दिवस पाणी आड मिळत असल्याकारणाने त्याचे प्रचंड हाल होत आहेत म्हणून आज विभागीय बैठक स्वतः लोकांनी आयोजित केलेली आहे आणि विभागातील उमटे धरण हद्दीतील सर्व लोकांना आमंत्रित केले आहे

अलिबाग-मुरुड मतदार संघातील लोकप्रतिनिधी,राजकीय नेते,विरोधक यांना वारंवार विनंती करून सुद्धा उमटे धरणातील गाळ हा गेला कित्येक वर्ष काढला गेलेला नाही आहे म्हणून नागरिक आता त्यांना न्याय मिळण्यासाठी स्वतः पुढे येऊन पुढाकार घेयाला लागलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांना उमटे धरण हद्दीतील जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याच्यावरून हे स्पष्टपणे दिसते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!