ताज्या घडामोडी

विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी 12 जुलै 2024 रोजी मतदान होणार

अलिबाग-रायगड

27 जुलै 2024 रोजी विधान परिषदेच्या विधानसभा सदस्यांद्वारे नियुक्त अकरा विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल समाप्त होत आहे

सर्व पक्षाच्या विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या आमदारांची यादी खालील प्रमाणे

                     शिवसेना

1. मनीषा कायंदे

2. अनिल परब

             भारतीय जनता पार्टी

1. विजय गिरकर

2. निलय नाईक 

3. रमेश पाटील

4. रामराव पाटील

                      काँग्रेस

1. अब्दुल्ला खान

2. मिर्झा वसाहत

3. प्रज्ञा सातव

             राष्ट्रीय समाज पक्ष 

1. महादेव जानकर

           शेतकरी कामगार पक्ष

1. जयंत पाटील

12 जुलै 2024 रोजी या सर्व रिक्त होणाऱ्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन भाग झाल्याच्या नंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार गट असे दोन भाग झाल्यानंतर प्रथमच विधान परिषदेच्या विधानसभा नियुक्त आमदारांच्या निवडणुका होणार आहेत शिवसेना शिंदे गटाकडे 40 आमदार तर अजित पवार गटाकडे सुद्धा 40 आमदार आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक अतिशय गुंतागुंतीची आणि रोचक होणार आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये गेली चार टर्म विधानपरिषद मध्ये आमदार असलेले शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील यांचा सुद्धा कार्यकाल संपत आहे आणि ते ह्या वेळेला त्यांचा निवडणूक अर्ज भरणार आहेत की नाही निवडणूक लढवणार आहेत की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्यामुळे महाविकास आघाडीतर्फे आमदार जयंत पाटील यांना उमेदवारी मिळू शकते परंतु येणाऱ्या कार्यकालमध्ये ह्या गोष्टीची स्पष्टता आपल्याला पाहायला मिळेल अजून पर्यंत कुठल्याही प्रकारच्या अधिकृत घोषणा ह्या कोणत्याही पक्षांनी केलेल्या नाहीत म्हणून जुलै महिना राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आमदार जयंत पाटील पुन्हा एकदा बाजी मारून पाचव्यांदा विधानपरिषदेवर जातात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!