आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी जनार्दन लखमा भगत यांची ग्रुप ग्रामपंचायत बोरघरच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.
2019 मध्ये ग्रुप ग्रामपंचायत बोरघरच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनार्दन लखमा भगत हे शेकाप मधून सदस्यपदी निवडून आले होते परंतु दोन वर्षानंतर काही कारणास्तव त्यांनी शिवसेना-शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेना-शिंदे गटात प्रवेश केला.त्यांच्या पाठोपाठ शेतकरी कामगार पक्षामधून निवडून आलेल्या आणखी दोन सदस्यांनी सुद्धा शिवसेना-शिंदे गटात प्रवेश केला.त्याच्यामुळे 11 सदस्यसंख्या असलेल्या बोरघर ग्रामपंचायतमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे 2019 मधे 6 सदस्य निवडून आलेल्यांपैकी 3 सदस्य शिवसेना-शिंदे गटात गेल्यामुळे शेकापचे उपसरपंच पद धोक्यात आले होते. 2019 मध्ये ग्रामविकास आघाडी मधून 5 सदस्य निवडून आले होते त्यापैकी 2 काँग्रेसचे, 2 शिवसेनेचे,आणि 1 भाजपचा होता.त्यामुळे विरोधकांकडे 11 पैकी 8 सदस्य संख्या झाली होती.तरीसुद्धा उपसरपंच पदी शेकापचे बोरघर ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मधुकर ढेबे यांच्या पत्नी दया मधू डेबे कायम होत्या.
परंतु 2022 च्या अखेरीस 2019 मध्ये शेकापमधून सरपंच पदी निवडून आलेल्या तृषा अरविंद भगत यांनी सुद्धा शिवसेना-शिंदे गटात प्रवेश केला.
शेकापची असलेली बोरघर ग्रामपंचायत शिवसेना-शिंदे गटाकडे गेली त्याच्या 9 महिन्यानंतर उपसरपंच दया ढेबे यांच्यावर 21/08/2023 रोजी विरोधकांकडून अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला.
त्यानुसार 28/08/2023 रोजी अविश्वास ठराव विरोधकांनी जिंकला
आज दिनांक 20/11/2023 रोजी जनार्दन लखमा भगत यांची बोरघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.