जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका फेब्रुवारी 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये अलिबाग तालुक्यातील 30 पेक्ष्या अधिक ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
नुकताच नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अलिबाग तालुक्यातील 15 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिलीप भोईर उर्फ छोटंम शेठ [जिल्हा उपाध्यक्ष भाजपा दक्षिण-रायगड] यांनी माणकुळे,किहीम,खंडाळे,कामार्ले,पेढांबे,शहाबाज आणि वाघ्रण अशा 7 ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे थेट सरपंच पदाचे उमेदवार दिले होते अलिबाग तालुक्यात शिंदे गट आणि शेकापचे वर्चस्व असताना छोटंम शेठ यांना भरपूर प्रमाणात मते मिळाली होती.त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी छोटंम शेठ यांची चांगलीच दखल घेतली आहे.
असे असतानाच 2024 च्या सुरुवातीलाच 30 पेक्ष्या अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका अलिबाग तालुक्यात होणार आहेत ह्यामध्ये छोटंम शेठ यांच्या झिराड ग्रामपंचायतीचा सुध्दा समावेश आहे शेकाप मध्ये असताना गेली कित्येक वर्षे झिराड ग्रामपंचायतीमध्ये छोटंम शेठ यांची एक हाती सत्ता आहे काही महिन्यांपूर्वी त्यांनी शेकाप सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे म्हणून अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायत ही अगोदरच भाजपने जिंकली आहे असे म्हणायला हरकत नाही
Back to top button
Don`t copy text!