अलिबाग तालुक्यातील नुकताच 5 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खानाव[अलिबाग]ग्रामपंचायत मध्ये ग्रामविकास परिवर्तन पॅनल आणि शिवसेना शिंदे गट अशी निवडणूक आपल्याला पहायला मिळाली 6 नोव्हेंबर 2023 रोजी निवडणूक निकालानंतर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार अजय नाईक यांनी शिवसेना-शिंदे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार संजय पोशा काष्टे यांचा 406 मतांनी पराभव केला. ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार अजय दशरथ नाईक यांना 1937 मते मिळाली तर शिवसेना शिंदे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार संजय पोशा काष्टे त्यांना 1531 मते मिळाली
तसेच उपसरपंच पदी निवड झालेले ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार निलेश गायकर यांना 719 मते मिळाली तसेच त्यांचे शिवसेना-शिंदे गटाचे प्रतिस्पर्धी उमेदवार मोहन बाळकृष्ण शिंदे यांना 256 मते मिळाले एकूण 463 मतांनी निलेश गायकर हे विजयी झाले
ग्रामविकास परिवर्तन पॅनलला एकूण 9 जागा मिळाल्या त्यापैकी एक जागा अगोदरच शिवसेना-शिंदे गटाने चुकीचा फॉर्म भरल्यामुळे बिनविरोध निवडून आलेली होती.
अशा प्रकारे गेली कित्येक वर्ष खानाव ग्रामपंचायत मध्ये एक हाती सत्ता आणणारे श्री.अनंत गोंधळी यांच्या पॅनलचा पराभव झाला. तसेच आज सर्व विजयी उमेदवारांनी ग्रामपंचायत मध्ये पदभार स्वीकारला