ताज्या घडामोडी
सुप्रिया सुळे [खासदार राष्ट्रवादी काँग्रेस] यांनी लोकसभा अध्यक्षांना रायगडचे बंडखोर खासदार सुनील तटकरे [अजित पवार गट] यांना अपात्र करण्यासाठी पत्र पाठविले
अलिबाग-रायगड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना राष्ट्रवादीचे रायगडचे बंडखोर खासदार सुनील तटकरे [अजित पवार गट] यांना अपात्र करण्यासाठी 3 नोव्हेंबरला पत्र दिले आहे
या पत्रात त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर अधिक विलंब करू नये असे म्हटले आहे पुढे त्यांनी अस लिहल आहे 5/07/2023 रोजी लोकसभेच्या नियम 6, 1985 अन्वये अपात्रता याचिका दाखल केली आहे ज्यामध्ये सुनील तटकरे यांना परिच्छेद 2(1)(अ) भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत अपात्र ठरवावे लागेल
सदर याचिका दाखल करून 4 महिने झाले आहेत परंतु तुमच्या कार्यालयाने दोषी खासदाराला नोटिस बजावण्याची किंवा या प्रकरणी तोंडी सुनावणीची मागणी करण्यासाठी कोणतीही कारवाई केली गेली नाही आहे
दहाव्या अनुसूचीच्या परिच्छेद 2 (1) (अ) अंतर्गत दोषी खासदाराने केलेल्या अपात्रेतेबाबत तपशीलवार कारणे घेतली आहेत कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नाही कारण अपराधी खासदाराने भाजपाशी हात मिळवणी केल्यामुळे दोषी खासदाराची कृती दहाव्या अनुसूचीवर निर्लज्ज हल्ला आहे दहाव्या अनुसूचिचे पावित्र्य राखले जाईल आणि त्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल याची खात्री करण्यासाठी दहाव्या अनुसूचीने तुमच्यावर मोठा विश्वास ठेवला आहे
पक्षांतराचे घटनात्मक पाप आणि अन्य पक्ष विरोधी कृत्ये अपात्र ठरलेल्या खासदाराला खासदार म्हणून कायम राहण्याची परवानगी देणे हे माननीय सर्वोच्च न्यायालयात धुडकावून लावले आहे आणि राजेंद्र सिंह राणा V स्वामी प्रसाद मौर्य [(2007)4 SSC 270] यांचा दाखला देणे उचित ठरेल
याच्यावर लोकसभा अध्यक्ष काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल