RDCC बँकेसाठी 16 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे यावेळी बँकेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे शेकाप यंदा महाविकास आघाडीच्या मदतीने लढणार आहे
सध्याच्या सत्ता संघर्षात शिवसेना शिंदेगट,भाजप आणि अचानक राष्ट्रवादी अजित पवार गट याने शिंदे-फडणवीस सरकार मध्ये एंट्री केल्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे
ज्यांच्या हातात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सत्ता त्या पक्षाकडे जिल्ह्यातील सहकाराची सूत्रे एकवटलेली असतात रायगड जिल्ह्यात सहकार क्षेत्र जास्त विस्तारलेले नाही याच संधीचा फायदा घेत शेतकरी कामगार पक्षाने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर एक हाती सत्ता मिळवली होती अनेकदा या बँकेची निवडणूक बिनविरोध झाली आहे
विरोधकांच्या वाढत्या ताकदीला शह देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष प्रथमच महाविकास आघाडीच्या मदतीने ही निवडणूक लढवत आहे मात्र राज्यातील राजकीय भूकंपानंतर निवडणुक रंगात आली आणि गुंतागुंती ही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे
RDCC बँकेवर शेतकरी कामगार पक्षाचा ताबा मागील 30 वर्षाहून अधिक काल आहे सर्वप्रथम 1990 च्या निवडणुकीत आर.एस.पाटील अध्यक्ष झाले होते त्यानंतर 1995 पासून आत्ताच्या निवडणुकीपर्यंत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे या बँकेचे अध्यक्ष आहेत या बँकेसाठी एकूण 21 मतदार संघ आहेत
शेकापणे सुरुवातीपासून केलेल्या मजबूत मोर्चे बांधणीमुळे अनेकदा ही निवडणूक बिनविरोध झाली होती या बँकेच्या जोरावर शेतकरी कामगार पक्षाने रायगड मधील राजकारणात आपला प्रभाव कायम ठेवला आहे परंतु अलीकडच्या सत्ता संघर्षात शेकापचे बहुतांश नेते दुसऱ्या पक्षात दाखल झालेले आहेत शेकापच्या कट्टर कार्यकर्त्यांनाही पक्ष सोडलेला असल्याने शेकापची ताकद कमी झाली आहे त्यामुळे शेकापने प्रथमच महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे
एकूण 21 जागांसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी जिल्हाभरातील 1369 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेली अनेक वर्ष निर्विवाद शेकापचे वर्चस्व राहिले आहे RDCC बँकेची आतापर्यंत संचालक सदस्य निवड ही बिनविरोध झाली आहे 2008 नंतर पहिल्यांदाच सदस्य पदाची निवडणूक होत आहे
पाच मतदारसंघातून 21 सदस्य रणांगणात
कृषी पतपुरवठा,विकास सेवा सहसंस्था मतदार संघातून 15 सदस्य,बँकेची संलग्न असलेल्या इतर संस्था मतदार संघातून दोन सदस्य,अनुसूचित जाती अनुसूचित जमाती राखीव मतदार संघातून एक सदस्य, भटक्या जाती विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून एक सदस्य महिला राखीव मधून दोन सदस्य
निवडणूक कार्यक्रम असा
31 ऑगस्ट ते पाच सप्टेंबर उमेदवारांनी 11 ते 3 वेळेतच नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी
सहा सप्टेंबर उमेदवारांना निशाणी वाटप आणि अंतिम यादी प्रसिद्ध
16 सप्टेंबर सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान
17 सप्टेंबर मतमोजणी
Back to top button
Don`t copy text!