24 ऑगस्ट 2023 रोजी मुरुड[रायगड]तालुक्याचे भाजप उपाध्यक्ष परेश किल्लेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबई शिवसेना भवन येथे अनंत गीते [माजी खासदार रायगड ठाकरे] सुरेंद्र म्हात्रे [जिल्हाप्रमुख-रायगड] यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला हा भाजपाला मोठा धक्का मानावा लागेल
2014 पासून देशात भाजपचे सरकार अस्तित्वात आहे तसेच 2014 ते 19 मध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे सरकार होतं 2019 नंतर तीन वर्षासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार होतं परंतु तीन वर्षानंतर एकनाथ शिंदे[मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य] यांनी जुलै 2022 मध्ये शिवसेनेमध्ये बंड करून 40 आमदारांसह विरोधात असलेला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत सत्ता स्थापन केली
देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना भारतीय जनता पार्टीचे मुरुड तालुक्याचे उपाध्यक्ष परेश किल्लेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश का करतात? हा प्रश्न नक्कीच मतदारांना आणि जनतेला पडला असेल
आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे फक्त 12 ते 13 आमदार असताना सुद्धा सत्तेत असलेले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात का प्रवेश करतात याचा शोध रायगड मधील भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी लावायला पाहिजे
येणाऱ्या कार्यकाळामध्ये 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि निश्चितच परेश किल्लेकर मुरुडचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष यांनी ठाकरे गटांमध्ये प्रवेश केल्यामुळे सध्याचे अलिबाग-मुरुड मतदार संघातील विद्यमान आमदार महेंद्र दळवी[शिंदे गट] यांची किती का होईना पण मतं कमी झाली कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजप युती मधून आमदार महेंद्र दळवी हे युतीचे उमेदवार असू शकतात त्याच्यामुळे या प्रवेशाचा फटका नक्कीच त्यांना सुद्धा बसलेला आहे
मुरुड तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष परेश किल्लेकर यांनी भाजप पक्ष का सोडला? याच्यासाठी AG MEDIA चे मुख्य संपादक यांनी परेश किल्लेकर यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही परंतु येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्यांची एक मुलाखत घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष पद का सोडलं आणि ठाकरे गटात का प्रवेश केला? हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचं प्रयत्न करणार आहोत
Back to top button
Don`t copy text!