२०डिसेंबर २०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील चालक-मालक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण चालू केले होते त्यावेळेला आमदार महेंद्र दळवी यांनी चालक-मालक संघटनेला प्रत्यक्षात भेट दिली होती आणि फोनवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बातचीत करून दिली होती त्याच्यानंतर ते आंदोलन तात्पुरता स्थगित केले गेले होते.
काही महिन्यानंतर चालक-मालक संघटनेच्या मागण्या पूर्ण होऊ न शकल्याने त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाच्या हत्यार हाती घेतले आणि त्याच्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी उद्योग मंत्री उदय सामंत महाडचे आमदार भरत शेठ गोगावले आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत एक विशेष बैठकीचा आयोजन करण्यात येईल असं सांगितलं होतं आणि चालक-मालक संघटनेच्या ज्या काही मागण्या होत्या त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अशी मागणी केली होती.
मिनीडोर चालक-मालक संघटनेचा दोन वर्षाचा मुदत कार्यकाल वाढवून त्यांना मिळालेला आहे अशा पद्धतीची फेसबुक पोस्ट द्वारे आमदार महेंद्र दळवी यांची माहिती दिली आहे आणि माझ्या प्रयत्नाने त्यांना न्याय मिळाला असं त्यांचं मत आहे.
Back to top button
Don`t copy text!