आमदार महेंद्र दळवी यांनी MMRDA मधून आणलेल्या १५० कोटीच्या विकास कामाची सुरुवात कधी होणार?
आमदार महेंद्र दळवी यांनी MMRDA मधून आणलेल्या १५० कोटीच्या विकास कामाची सुरुवात कधी होणार?

१२ मे २०२३ रोजी आमदार महेंद्र यांचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने MMRDA च्या माध्यमातून १५० कोटी रुपयांच्या विकास कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी दिला असे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले.
ही कामे पावसाळ्याच्या तोंडावर मंजूर झाल्याने कामे होतील की नाही असा जनतेच्या मनात संभ्रम आहे.कामाची कागदपत्रे सदर करणे, अंदाजपत्रक बनविणे,निविदा काढणे यासाठी बराच वेळ जातो.पावसाळा सुरू व्हायला आता फक्त १५ दिवस राहिले असताना १५० कोटीची कामे कधी होतील.तसेच पावसाळ्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुका होणार असल्या कारणाने आचार संहिता लागलेली असताना कामे कशी करायची हो मोठा प्रश्न आमदार महेंद्र दळवी यांचा समोर असेल.निवडणुकांचा ताण सरकारी अधिकारी यांच्यावर असल्या कारणाने ते वेळ देतील की नाही हा पण एक प्रश्न आहे असो ही कामे लवकर होऊन जनतेला त्याचा फायदा होईल अशी आशा अपेक्षा बाळगू या.