ताज्या घडामोडी
निसर्ग चक्री वादळाप्रमाणे बिपरजॉय चक्रीवादळ रायगड मध्ये काही दिवसात धडकणार
अलिबाग-प्रतिनिधी

जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळाला सुरुवात झाली होती जवळजवळ ताशी १५० ते २०० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते अतिशय मोठ्या प्रमाणात घरांची, विजेच्या पोलची झाडांची नुकसान झालेली आपण पाहिली आहे तसेच एक नवीन चक्रीवादळ बिपर जॉय येणाऱ्या काही तासात दिवसात रायगड मध्ये धडकणार आहे त्या संदर्भात ४/०६/२०२३ रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने एक सूचना पत्रक जारी केलेलेआहे त्यांच्या सूचना काय आहेत त्या पहिल्यांदा तुम्ही वाचा
म्हणून सर्व नागरिकांनी सतर्क राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून जेव्हा बिपर जॉय या चक्रीवादळाला सुरुवात होईल त्यावेळेला योग्य ती खबरदारी जनतेने घ्यायला पाहिजे जेणेकरून कुठेही जीवित हानी होणार नाही २०२० च्या निसर्ग चक्रीवादळामध्ये एक व्यक्ती आंबेवाडी(अलिबाग) येथील निसर्ग चक्रीवादळ चालू असताना अंगावर लाईटची डीपी पडली असल्याकारणाने मृत्युमुखी पडला म्हणून नागरिकांनी येणाऱ्या काही तासांमध्ये किंवा दिवसांमध्ये रात्री कुठेही बाहेर फिरायला जाऊ नये निसर्ग चक्रीवादळामध्ये भरपूर प्रमाणात गाड्यांनाही त्याचा फटका बसलेला आहे म्हणून योग्य ती खबरदारी घेऊन आपणच आपलं संरक्षण करायच आहे.