अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्ह्यात मोरोंडे ते बारशेत रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मधून 12 कोटी 28 लाख निधी मंजूर 
अलिबाग तालुक्यात सत्तेवाडी,होंडावाडी,सत्तेवाडी आणि बारशेत ही चार गावे आहेत या चार गावांचे वैशिष्ट्य म्हणजे देश स्वतंत्र होऊन 75 वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे तरीसुद्धा या चार गावांमध्ये जायला पक्का डांबरी रस्ता नव्हता गेले पाच वर्ष मी सोशल मीडियाच्या माध्यमातून या गावात जायला रस्ता नाही आणि तो का होत नाही याच्याबद्दल सत्ताधारी यांना ग्राउंड रिपोर्ट करून वस्तुस्थिती दाखवून वारंवार प्रश्न विचारत होतो परंतु या चार गावांकडे कधीही प्रयत्न करत नव्हते की त्यांना पक्का रस्ता मिळायला पाहिजे खरं म्हणजे या चार गावांकडे जाण्यासाठी मोरोंडे गावापासून सुरुवात होते आणि डोंगरातून या गावांमध्ये जायला रस्ता असल्याकारणाने तेथील जनतेचे अतोनात हाल हे गेले कित्येक वर्ष होत आहेत जवळजवळ पायथ्यापासून ते त्यांच्या गावापर्यंत जायला सहा ते सात किलोमीटर अंतर आहे आणि अशा परिस्थितीत एवढ्या वर्ष ही लोक त्यांना पक्का रस्ता नसल्याकारणाने हाल भोगत आहेत
18 जुलै 2024 रोजी ग्रामविकास विभागाकडून या रस्त्याला 12 कोटी 28 लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे अशा पद्धतीचा जीआर प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या कार्यकालमध्ये त्या चार गावांमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता तेथील ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहे आज अलिबाग तालुक्यात अशी कितीतरी डोंगर माथ्यावर गाव आहेत जिथे जायला अजून पर्यंत पक्का रस्ता नाही आहे आणि तेथील ग्रामस्थ त्यांना पक्का रस्ता मिळावा म्हणून कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत आपल्या न्याय हक्कासाठी भांडत आहेत परंतु त्यांना जायला अजून पर्यंत पक्के रस्ते सत्ताधाऱ्यांकडून मिळत नाही आहेत ज्या पद्धतीने या चार गावांकडे जाण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचप्रमाणे अलिबाग तालुक्यातील जी इतर गावे आहेत त्यांना सुद्धा जायला पक्का रस्ता नाही त्यांच्या गावासाठी सुद्धा शासनाने निधी उपलब्ध करून त्यांच्या समस्या सोडवायला पाहिजे
Back to top button
Don`t copy text!