ताज्या घडामोडी
राजूदादा ग्रुप रामराज विभाग आयोजित 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धेमध्ये रायगड पोलीस नितीन रसाळ यांचा बॅटिंगचा धुमधडाका
अलिबाग-रायगड

राजूदादा ग्रुप प्रमुख राजू जाधव यांच्या तर्फे रामराज विभाग अलिबाग येथे पहिल्यांदाच 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये करंजाई टीम उमटे कडून खेळताना रायगड पोलीस नितीन रसाळ यांनी 5 षटकार आणि 3 चौकार मारून आपल्या टीमला उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला.
नवतरुण असताना नितीन रसाळ यांना पहिल्यापासून क्रिकेटची फार आवड आहे.ते नवतरुण असताना आपल्या टीमला त्यांनी अनेकदा फायनल सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता.नंतर ते पोलीस दलामध्ये रायगड पोलीस म्हणून भरती झाले नोकरी निमित्त सतत कामावर असल्यामुळे क्रिकेटच्या सरावांमध्ये खंड पडत गेला आणि हळूहळू क्रिकेट पासून ते लांब होत गेले पण अलिबाग तालुक्यात रामराज विभागात पहिल्यांदाच 3 फेब्रुवारी 2024 ला राजू जाधव यांनी 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे त्या निमित्ताने विभागातील जवळजवळ 24 टीमने या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे काल झालेल्या सामन्यांमध्ये वय वर्ष 40 असून सुद्धा नितीन रसाळ यांनी चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडवली आणि आपल्या टीमला उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला त्याच्यामुळे सगळीकडेच त्यांच्या फलंदाजीची चर्चा होत आहे.त्यांनी दोन सामन्यात दोन डावांमध्ये 5 षटकार आणि 3 चौकार ठोकले.
कामानिमित्त आणि आपल्या कुटुंबासाठी सतत वेळ घालवत असताना आणि ऐन तारुण्याच्या भरात कामाला लागल्यामुळे आपल्या इच्छा आकांक्षावर नेहमीच युवकांना पाणी फिरवावे लागत असतं परंतु एक अशा आगळ्यावेगळ्या 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धेचे राजू जाधव यांनी आयोजन केल्यामुळे विभागातील नेहमी कामधंद्यावर असलेल्या लोकांना क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली त्याच्यामुळे विभागांमध्ये सर्वत्र या क्रिकेट स्पर्धेचे कौतुक होत आहे प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धेला मिळत आहेत.