ताज्या घडामोडी
Trending
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका बहुतेक २०२३ च्या पावसाळ्यानंतरच
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका बहुतेक २०२३ च्या पावसाळ्यानंतरच

अलिबाग-रायगड
रायगड जिल्हा परिषदेचा कार्यकाल एक वर्षापूर्वी संपला आहे.सद्या प्रशासक आहे. राज्यात महविकास आघाडीचं सरकार असताना बहुतेक महानगर पालिका आणि जिल्हापरिषद यांचा कार्यकाल संपला होता.
अचानक राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे फडवणीस यांचं नवीन सरकार आलं.सत्ता स्थापन झाल्यापासून ७ ते ८ महिन्याचा कालावधी झाला आहे पण अजून जिल्हापरिषद यांच्या निवडणुका जाहीर झाल्या नाही.२०२२ संपून २०२३ आले आहे तरी अजून निवडणुका नाही.येणाऱ्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा यांची मुदत संपत आहे म्हणून कदाचित रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका पावसाळा संपल्या नंतर होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.