बुधवार दिनांक 27 मार्च रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाने निर्धार मेळावा आयोजित केला होता या निर्धार मेळाव्याला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सुद्धा उपस्थित होते मागील आठवड्यामध्ये सुनील तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे काही पदाधिकारी,कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये पक्ष प्रवेश करून घेतला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून शेतकरी कामगार पक्षाने हा निर्धार मेळावा आयोजित केलेला होता
या मेळाव्यात व्यासपीठावरून आमदार रोहित पवार यांनी आणि शेकाप आमदार जयंत पाटील यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा भरपूर समाचार घेतला तसेच या मेळाव्यानिमित्त शेतकरी कामगार पक्षाने मुरुड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीला धक्का दिलेला आहे मुरुड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा अध्यक्ष महेश जानू ठाकूर यांच्यासह नरेंद्र शहापूरकर,निलेश ठाकूर,अनिश बयकर,गणपत बयकर,अमित शहापूरकर,निकम माळी सह 30 जणांनी शेकापमध्ये प्रवेश केला तसेच भाजपा युवामोर्चा उपाध्यक्ष पंचायत गण मुरुडचे अध्यक्ष गणेश दिवेकर यांच्यासह हरिचंद्र दिवेकर,हेमंत दिवेकर,अनिल घोसाळकर यांनी सुद्धा शेकापमध्ये प्रवेश केला तसेच भाजपा आयटी सेलचे संदीप चिराऊ यांनी सुद्धा शेतकरी कामगार पक्षांमध्ये प्रवेश केला
Back to top button
Don`t copy text!