ताज्या घडामोडी

सुनील तटकरे यांना महायुतीतून रायगड लोकसभेची उमेदवारी जाहीर

अलिबाग-रायगड

रायगड जिल्ह्याचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघांमधून महायुतीतून उमेदवारी जाहीर झालेली आहे महायुतीमध्ये सध्या भाजपा,शिंदे गट, आणि अजित पवार गट हे तीन मोठे घटक पक्ष आहेत 2019 मध्ये शेतकरी कामगार पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस असे सुनील तटकरे आघाडी मधून निवडणूक लढले होते आणि पहिल्यांदाच रायगडचे खासदार झाले होते रायगड मतदार संघातून सहा वेळा खासदार राहिलेले अनंत गीते यांचा त्यांनी 31621 मतांनी पराभव केला होता

रायगड लोकसभेच्या जागेसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे आणि 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे पुन्हा एकदा सुनील तटकरे हे रायगड लोकसभेचे खासदार होतात का? हे पाहणं महत्त्वाचे ठरेल कारण की एक सेक्युलर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष एक हिंदुत्ववादी पक्षाशी युती करून 2024 ला खासदारकीची निवडणूक लढवत आहे नेहमीच देशाच्या राजकारणामध्ये विरोधी भूमिका दर्शवणारे दोन पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी आता 2024 ला सर्व मतभेद विसर विसरून आणि कशासाठी एकत्र आलेले आहेत हे त्यांचं त्यांनाच माहित असावं

2019 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांना मदत केली होती परंतु 2024 च्या निवडणुकीच्या लढतीत ते यंदा अनंत गीते यांच्यासोबत आहेत आणि शेकाप शिवाय आणि शेकापच्या मदतीशिवाय रायगडचा खासदार कोणीही होऊ शकत नाही अशी शेकापच्या सर्वच नेत्यांची भूमिका राहिलेली आहे जर खरोखर या वेळेला सुद्धा आनंद गीते शेकापच्या पाठिंब्याने जिंकले तर रायगडच्या खासदाराला जिंकण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा सिंहाचा वाटा असतो हे सिद्ध होईल

सुनील तटकरे यांना रायगड लोकसभेची महायुतीतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं जातं आहे आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!