ताज्या घडामोडी
उसर(अलिबाग)येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत बांधकाम कधी चालू होणार
अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग रायगड
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना गेल्या वर्षी ऊसर अलिबाग इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन सोहळा शरद पवार,अजित पवार अदिती तटकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला त्या गोष्टीला आता एक वर्ष उलटून गेले आहे तरी एक वीट सुद्धा अजून रचली गेली नाही आहे
याला जबाबदार कोण? अलिबाग तालुक्यात अलिबाग येथे जिल्हा रुग्णालय आहे पण हे ५०० खाटांचे रुग्णालय तयार झाले तर जनतेला दिलासा मिळू शकतो आज जर जिल्ह्यात कोण जास्त आजारी रुग्ण असेल तर पुढील उपचारासाठी मुंबई इथे जायला लागते. रुग्णालयाच्या इमारतीचे काम लवकर सुरू व्हायला पाहिजे यासाठी स्थानिक आमदार कुठेच प्रयत्न करताना दिसत नाही