अलिबाग तालुक्यातील रामराज आणि फणसापूर शाखेतील लाईट वारंवार जाते म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी 5/6/2024 रोजी महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना एक पत्र दिलेल आहे आणि वारंवार लाईट का जाते याबद्दल जाब विचारलेला आहे

192 अलिबाग-मुरुड मतदार संघात ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्याच्यापैकी लाईट ही फार मोठी समस्या आहे गेले कित्येक लाईट या विषयांवर मी पत्रकार या नात्याने वारंवार प्रश्न उपस्थित करत असतो परंतु अजूनही लाईट वारंवार का जाते? ही समस्या अलिबाग तालुक्यातील महावितरण कंपनीने सोडवलेली नाही आहे
सध्या रायगड जिल्ह्यामध्ये अलिबागच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवलेली आहे गणपती कारखानदार सुद्धा या लाईटच्या समस्यामुळे हैराण झालेले आहेत ऐन गणपती उत्सवाच्या तोंडावर वारंवार लाईट जात असल्याकारणाने गणपती कारखानदारांना गणपती रंगवण्याचे काम पूर्ण करता येऊ शकत नाही आहे वर्षातून एकदा त्यांना हे काम मिळत असतं आणि ते सुद्धा जर अशा सोयी साधनांच्या अभावी पूर्ण करण्यामध्ये अडथळा येत असेल तर महावितरण कंपनीला एक दुसरा पर्याय असला पाहिजे असं मी वारंवार माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बोललेलो आहे ज्या वेळेला एखादा दुसरा पर्याय मार्केटमध्ये येतो त्यावेळेला प्रत्येक जण आपापली चांगली सुविधा कशी देता येईल यासाठी कटिबद्ध असतो परंतु महावितरण कंपनीला कोणताही पर्याय रायगड मध्ये नसल्याकारणाने नागरिकांचे अतोनात हाल होत आहे पण महावितरण कंपनीला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे
लाईटचा हा विषय मी विधान परिषदेतील शेकापचे आमदार जयंत पाटील यांना भेटून सांगणार आहे आणि सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू आहे अलिबाग तालुक्यातील लाईटच्या समस्यांचा प्रश्न त्यांनी विधानपरिषद मांडावा आणि संबंधित ऊर्जा मंत्र्यांच्या माध्यमातून महावितरण कंपनीला जाब विचारून जे कोणी कर्मचारी आणि अधिकारी असतील ते त्यांचं काम योग्य पद्धतीने करत नाहीत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी ही AG MEDIA चा मुख्य संपादक म्हणून त्यांना विनंती करणार आहे
Back to top button
Don`t copy text!