ताज्या घडामोडी
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्षालगडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाडीवर दरड कोसळून ७ जणांचा मृत्यू
प्रतिनिधी-रायगड

बुधवार दिनांक १९ जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्षालगडावरील चौक गावापासून ६ किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासींची वाडी आहे येथे रात्री दरड कोसळल्याची घटना घडली आहे
प्राथमिक माहितीनुसार मलब्याखाली अंदाजे १७८ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे.यामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे
३० ते ४० घरांची वस्ती असलेल्या आदिवासी वाडीत २०० लोकांची वस्ती आहे घटनास्थळी जायला पक्का रस्ता नसल्याने २ ते ३ किलोमीटर पायी चालत जावे लागते NDRF टीम जागेवर पोहचली असून बचावकार्य सुरू आहे घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,रायगडचे पालकमंत्री उदय सामंत भाजप आमदार गिरीश महाजन यांनी भेट दिली आहे