बेलकडे ते रोहा रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काल दुरुस्त करण्यासाठी ठाकरे गटाचे अलिबाग तालुकाप्रमुख महेश (शंकर) गुरव यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
अलिबाग कडून रोहाकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 91 बेलकडे ते रोहा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झालेल आहे आणि पावसाला चालू आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी रस्त्याची परिस्थिती असताना अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे ही बाब लक्षात घेऊन ठाकरे गटाचे अलिबागचे तालुकाप्रमुख शंकर गुरव यांनी अलीबागच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला त्याबद्दल निवेदन दिल आहे आणि सदरचे खड्डे तात्काळ दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून त्यांनी केलेली आहे
रस्त्यावर अतिशय प्रमाणत खड्डे असल्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना मणक्याचे,मानेचे आणि कमरेच्या दुखण्यांचे त्रास चालू झालेले आहेत असं शंकर गुरव यांचे म्हणणं आहे म्हणून सदर रस्ता हा लवकर दुरुस्त करावा अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने काम करू असा सूचक इशारा त्यांनी अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेला आहे