ताज्या घडामोडी
चंद्रशेखर नलावडे पाटील शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालय सदस्य यांनी AG मीडियाचे मुख्य संपादक अतिशय गायकवाड यांना मुलाखत दिल्यामुळे भाई जयंत पाटील यांनी पक्षातून केली हकालपट्टी
अलिबाग रायगड

दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी AG मीडियाचे मुख्य संपादक अतिश गायकवाड यांना चंद्रशेखर नलावडे पाटील राहणार कोल्हापूर शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालय सदस्य यांनी एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्रातून सतत कमी का होत चालला आहे याबद्दल चिंता व्यक्त केली होती पक्ष त्याची मूळ विचारधारा सोडून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भरकटलेला आहे असं त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं होतं मात्र लगेच दुसऱ्या दिवशी 8 एप्रिल 2024 रोजी त्यांना शेतकरी कामगार पक्षातून हकालपट्टीचे पत्र देण्यात आलं
