ताज्या घडामोडी
अजित पवार गटाला निवडणूक आयोगांनी राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह देण्याचा निर्णय दिला
अलिबाग-रायगड

काल दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक आयोगाने अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे असे नोंदवत अजित पवार गटाला राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह हे दोन्ही देत एक धक्कादायक निर्णय दिला.
दोन जुलै 2022 रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिंदे आणि भाजप सरकार मध्ये 40 पेक्षा जास्त आमदारांसह जाण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी पक्षावरच दावा ठोकला त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक आयोगाकडे गेले त्यांनी निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी हा माझाच पक्ष आहे मीच पक्षाचा अध्यक्ष आहे असं सांगितलं त्याच्यानंतर अजित पवार गट सुद्धा निवडणूक आयोगाकडे गेला त्यांनी सुद्धा सांगितलं की सगळ्यात जास्त आमदार माझ्याकडे आहेत मला जास्त आमदारांचा पाठिंबा आहे.त्याच्यामुळे राष्ट्रवादी पक्ष हा माझाच आहे ह्या गोष्टीला जवळजवळ 7 महिने झाल्यानंतर काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह दिलं हा शरद पवार यांना मोठा हादरा मानला जाईल.
निवडणूक आयोगाने काय म्हटलं.
1.अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.
2.पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याची अजित पवार यांना परवानगी.
3.शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता.
4.महाराष्ट्रातील 41 आणि नागालँड मधील 7 आमदार अजित पवारांच्या बाजूने आहेत.
5.लोकसभेत दोन खासदार अजित पवारांच्या बाजूने आहेत.
6.एका खासदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिले.
7.महाराष्ट्रातल्या 7 आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिले.
8.राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्ह आणि पक्षाच नाव सुचवावे.
9.7 फेब्रुवारी 2024 पर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत पर्याय न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल.
10.राष्ट्रवादीत पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गाने झाल्या नाहीत.