अजय गायकर युवासेना जिल्हा समन्वयक रायगड शिवसेना शिंदेगट आयोजित आमदार युवासेना चषकाच्या तिसऱ्या पर्वाला दिनांक 9 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात होत आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 51 हजार व आकर्षक चषक,द्वितीय क्रमांक 31 हजार व आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांक 15 हजार व आकर्षक चषक असे बक्षीस असतील तसेच मालिकावीरासाठी सायकल असेल,उत्कृष्ट फलंदाजासाठी कुलर असेल आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी कुलर असेल
अलिबाग-मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांचे अतिशय विश्वासू आणि निकटवर्तीय अशी अजय गायकर यांची ओळख आहे 2022 मध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केले होते त्यावेळेला आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता पक्षांतरबंदी कायद्यामुळे एकनाथ शिंदेसह बंड केलेले सर्वच आमदार अपात्र होऊ शकतील असे सगळीकडे म्हटले जात असताना सुद्धा आमदार महेंद्र दळवी यांचे अलिबाग मतदार संघातील दोन खंदे समर्थक सध्याचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी आणि आणि अजय गायकर युवासेना रायगड जिल्हा समन्वयक हे खंबीरपणे महेंद्र दळवी यांच्या पाठीमागे उभे राहिले आमदार महेंद्र दळवी बाद होतील की नाही याची त्यांनी अजिबात परवा न करतात त्यांना पाठिंबा दर्शविला होता म्हणून अजय गायकर यांच्या आमदार युवासेना चषकाला आमदार महेंद्र दळवी दरवर्षी भेट देतात त्याच्यावरून हे स्पष्ट होते की आमदारांच्या मनात सुद्धा अजय गायकर यांच्याबद्दल एक वेगळी जागा आहे
रामराज विभागात एकट्याच्या जीवावर एवढ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणारे अजय गायकर हे एकमेव राजकीय नेते आहेत याच्या अगोदर कोणीही एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन रामराज विभागात केलेलं नव्हतं गेली तीन वर्षे सतत ते या स्पर्धेचे आयोजन करीत आहेत आमदार युवासेना चषकामुळे ग्रामीण विभागातील युवकांना अजय गायकर यांच्यामुळे मोठ्या स्पर्धा खेळण्याची संधी मिळायला लागली आहे त्याच्यामुळे विभागातील बहुसंख्य युवक आमदार युवासेना चषकाची वाट पाहत असतात त्यांची आतुरता आता संपलेली आहे अजय गायकर आमदार युवासेना चषक 9 फेब्रुवारी 2024 ला त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षीप्रमाणेही यावर्षी दिमाखात तुमच्या भेटीला येत आहे
Back to top button
Don`t copy text!