ताज्या घडामोडी

महेश मोहिते जिल्हा सरचिटणीस BJP द.रायगड आणि खासदार सुनील तटकरे या दोघांमध्ये काय गुप्तगु झाली असेल?

अलिबाग-रायगड

कुस्ती प्रशिक्षण केंद्र भूमिपूजन सोहळा वाडगाव येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर रायगड जिल्ह्याचे विद्यमान खासदार सुनील तटकरे,भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते आणि अलिबाग मुरुड मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र दळवी शिवसेना शिंदे गट एकत्र येताना दिसले 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून 40 आमदारांसह भाजपा सोबत सरकार स्थापन केलं त्या घटनेला जवळजवळ एक वर्ष झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये अचानक बंड करून जुलै महिन्यात शिंदे सरकार आणि भाजपा सरकारला पाठिंबा दर्शवला.त्यांच्या सोबतही 40 पेक्षा जास्त आमदार गेले असे असताना 2024 च्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर जागावाटप झालेल्या चर्चांना काही दिवसापूर्वी उधाण आले होते त्याच्यामध्ये एकूण 48 जागांपैकी भाजपला 32 जागा,शिवसेना शिंदे गटाला 10 जागा अजित पवार गट राष्ट्रवादीला 6 जागा असे जागा वाटप झाले अशी सगळीकडे चर्चा होती.

काही महिन्यापूर्वी पेणचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टी मधून धैर्यशील पाटील हे रायगडचे लोकसभेचे उमेदवार असतील अशा चर्चा होत होत्या.त्यावेळेला अजित पवार यांनी बंड केलेले नव्हते आणि भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे दोनच पक्ष सरकारमध्ये एकत्र होते म्हणून धैर्यशील दादा पाटील यांची रायगडची लोकसभेची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली होती.परंतु जुलै 2023 मध्ये अजित दादा यांनी विद्यमान सरकारमध्ये सामील होऊन सर्वांनाच धक्का दिला आणि त्याच्यानंतर रायगडची जागा कोणाला मिळेल? याच्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला मागील महिन्यात भारतीय जनता पार्टीचा बूथ कार्यकर्ता मेळावा माणगाव आणि अलिबाग येथे पार पडला या मेळाव्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा जनतेची जर इच्छा असेल तर धैर्यशील दादा पाटील यांचे नाव आपण रायगडचे लोकसभेचे उमेदवार म्हणून वरिष्ठांना सुचवू असं प्रतिपादन केलेलं होतं.परंतु काही दिवसानंतर हे जागावाटपचे आकडे समोर आले आणि रायगडची जागा ही सुनील तटकरे यांना मिळू शकते असे एकंदरीत चित्र निर्माण झाले.नारायण राणे केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री यांनी मागील महिन्यामध्ये आदिवासी जणजमात कार्यक्रमाला उपस्थित लावली होती परंतु त्या कार्यक्रमाला दक्षिण रायगडचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धैर्यशील दादा पाटील गैरहजर होते म्हणून रायगडची लोकसभेची जागा विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या वाट्याला जाते की काय असेच एकंदरीत दिसून येत होते.

काल दी.2 फेब्रुवारीला कुस्ती प्रशिक्षण केंद्र भूमिपूजन सोहळा वाडगाव येथे व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये भर व्यासपीठावर आपल्याला काहीतरी चर्चा होताना स्पष्टपणे या फोटोच्या माध्यमातून दिसत आहे सुनील तटकरे आणि महेश मोहिते यांचे पहिल्यापासून जवळचे संबंध असल्यामुळे सुनील तटकरे हे कदाचित रायगडची जागा भाजपने मला सोडावी याच्यावर तर चर्चा झाली नसेल ना की, महेश मोहिते यांनी सुनील तटकरे यांना विनंती केली असेल की रायगडची लोकसभेची जागा तुम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धैर्यशील दादा यांना सोडा योग्य वेळी AG MEDIA चे मुख्य संपादक अतिश गायकवाड ऍड.महेश मोहिते यांची मुलाखत घेऊन तुमच्या दोघांमध्ये काय चर्चा रंगली होती याच्याबद्दल स्पष्टीकरण जाणून घेण्याचा प्रयत्न करतील लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होईल त्यावेळेला चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल की रायगडचा खासदार पदाचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा असेल की राष्ट्रवादी अजित पवार गटाचा असेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!