रायगड जिल्ह्यातील १३० आदिवासी वाड्या या रस्ते,पाणी,आरोग्य आणि वीज यासारख्या सोयी सुविधांपासून आजपर्यंत राजकीय व शासकीय दुर्लक्षतेमुळे वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या 11 टक्के आदिवासी समाज आहे या मध्ये ठाकूर व कातकरी समाजाचे वास्तव्य जिल्ह्यातील विविध वाड्या,वस्त्यांवर आहे.आदिवासी जंगलात रहात असल्याने त्या ठिकाणी वन कायदा लागू होतो त्यामुळे वन विभागाने मंजुरी न दिल्याने रस्ते अपूर्णच आहेत त्यामुळे दिवसा,अपरात्री आदिवासींना या खडतर रस्त्यानेच प्रवास करावा लागतो रस्ता नसल्याने वाहने गावात जात नाहीत त्यामुळे रुग्णांना डोलीच्या साह्याने रुग्णालयात आणावे लागते.
तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी देखील आदिवासी वाड्यांवर रस्ते पोहचावेत यासाठी संबंधित यंत्रणांना पत्र काढून आदेश दिले होते त्यामध्ये पंधरा तालुक्यांचे गटविकास अधिकारी तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा समावेश आहे अशी संतोष ठाकूर [आदिवासी नेते] यांनी सरकार व प्रशासनापुढे व्यथा मांडली आहे
Back to top button
Don`t copy text!