ताज्या घडामोडी
पोस्ट खात्यातील किसान सन्मान निधीचे २००० रू काढताना शेतकऱ्यांना अडचण-आमदार महेंद्र दळवी यांनी समस्या सोडवावी
प्रतिनिधी अलिबाग

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेतून शेतकऱ्यांना दर वर्षाला ६००० रुपये मिळतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2019 या वर्षी ही योजना चालू केली होती.या योजनेनुसार शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपये मिळतात.परंतु 31/03/2023 रोजी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली.ई-केवायसी मोहीमे नंतर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणे बंद झाले.
नवीन ई-केवायसी करून किसान सन्मान निधीचे पैसे न आलेल्या शेतकऱ्यांनी पोस्ट ऑफीस मध्ये खाती उघडली त्यानुसार त्यांचा किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता 27 जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांच्या पोस्ट ऑफिस मधील खात्यात जमा झाला.
परंतु विभागातील पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये फक्त 2500 हजार रुपयेच व्यवहारासाठी असतात असे अधिकारी यांनी AG MEDIA चे मुख्य संपादक अतिश गायकवाड यांना सांगितले आज दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी शेतकरी पोस्ट ऑफिस मध्ये पैसे काढायला गेल्यावर समजले आवश्यक पैसे पोस्ट ऑफिस मध्ये नसल्या कारणाने लांबून आलेल्या गावातील शेतकऱ्यांना खाली हाताने परतावे लागले.सद्या शेतात भाताच्या लावणीचे काम चालू असताना पोस्ट ऑफिसच्या खात्यात पैसे असूनही शेतकऱ्यांना पोस्ट ऑफिसच्या नियमामुळे पैसे काढता येत नाही हे दुर्दैवी आहे.
ह्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन AG MEDIA चे मुख्य संपादक अतिश गायकवाड यांनी त्वरित अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांना फोन करून शेतकऱ्यांची समस्या सांगितली त्यांनी पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी लगेच प्रयत्न करतो असे आश्वासन दिले आहे