ताज्या घडामोडी
खासदार सुनील तटकरे यांची केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना ८ तालुक्यांमध्ये ९३ की. मी.प्रधानमंत्री ग्रामसडक योनेअंतर्गत रस्त्यासाठी मागणी पत्र
अलिबाग-प्रतिनिधी

अलिबाग रायगड
रायगडाचे खासदार सुनील तटकरे यांनी कपिल पाटील (केंद्रीय मंत्री) यांना रायगड जिल्यातील ८ तालुक्यांमध्ये ९३ किलोमिटर रस्ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर होण्यासाठी पत्र दिले
२२ जून २०२२ रोजी तटकरे यांना केंदिय मंत्री गिरिराज सिंह (ग्रामीण विकास तथा पंचायत राज मंत्री)यांनी पत्र लिहून आपण विनंती केल्यानुसार ११ तालुक्यांमध्ये ७९ किलोमिटर रस्ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर केले आहेत हे सूचित केले होते.
या अगोदर सुद्धा सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना रायगड जिल्यातील खराब रस्त्यांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते मंजूर होण्यासाठी पत्र लिहिले होते आणि कामे मंजूर झाले होते