निलेश गायकर-अध्यक्ष [संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समिती] यांना गेलं कंपनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्याकडून पत्र
अलिबाग तालुक्यातील उसर येथे गेल कंपनीमध्ये पॉलिमर नावाचा नवीन प्रकल्प आलेला आहे त्याच्यामुळे गेल कंपनी आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त यांच्यामध्ये त्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षभरापासून आपण संघर्ष पाहत आहोत.नोकरीमध्ये कायमस्वरूपी सामावून घेणे आणि अशा विविध स्वरूपाच्या प्रकल्पग्रस्त यांच्या मागण्या आहेत त्याच्यासाठी संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे गेल कंपनीच्या गेट समोर गेली 70 ते 80 दिवस साखळी उपोषण आंदोलन चालू होत परंतु कंपनी प्रशासन आणि प्रकल्पग्रस्त यांच्यात कोणतीही तडजोड झाली नाही
अखेर शेवटी निलेश गायकर-अध्यक्ष संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समिती यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने गेल कंपनी व्यवस्थापनाच्या अन्याया विरोधात 1 डिसेंबर 2023 रोजी पासून कामबंद आंदोलन चालू केल आहे.
कामबंद आंदोलनाचा आज 8 वा दिवस आहे आणि AG मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 12/12/ 2023 रोजी निलेश गायकर-अध्यक्ष संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समिती,इतर आणि व्यवस्थापक गेल इंडिया लि.पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट उसर,ता.अलिबाग,जि.रायगड यांची रायगड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 3 वाजता राजस्व सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे आता तरी प्रकल्पग्रस्त आणि कंपनी प्रशासन यांच्यामध्ये काही निर्णय लागतोय काय? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल