२०१९ मध्ये बोरघर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शेकापच्या उमेदवार तृषा अरविंद भगत थेट सरपंच म्हणून निवडून आल्या तसेच ११ सदस्यांची ग्रामपंचायत असलेल्या सदस्यांपैकी शेकापचे-६ काँग्रेसचे-२, शिंदे गटाचे-२ आणि भाजप-१ असे पक्षीय बलाबल होते.असे असल्यामुळे बोरघर ग्रामपंचायतीचे वॉर्ड क्रमांक ४ चे शेकापचे नेते माजी सरपंच मधुकर मधू ढेबे यांच्या पत्नी दया ढेबे यांच्या गळयात उपसरपंच पदाची माळ पडली
निवडणुकीनंतर दोन वर्षांनी नाराज असलेले शेकापचे सदस्य जनार्दन भगत यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला,तसेच शेकाप सदस्य नारायण पिंगळा आणि मंजुळा काष्टे यांनी सुध्धा शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे बोरघर ग्रामपंचायत मध्ये बहुमत असलेला शेतकरी कामगार पक्ष अल्पमतात गेला आणि शिंदे गटाची सदस्य संख्या वाढली. पण तरीसुद्धा मधु ढेबे यांच्या पत्नी उपसरपंच दया ढेबे यांचे पद कायम होते कोणीही त्याच्यावर आक्षेप नोंदविला नव्हता
सर्व काही सुरळीत चालू असताना २७ डिसेंबर २०२२ रोजी शेकापच्या बोरघर ग्रामपंचायतीच्या सरपंच तृषा अरविंद भगत यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला सरपंच तृषा अरविंद भगत यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करून सात महिन्यापेक्षा जास्त वेळ जाऊन सुद्धा दया ढेबे यांचं उपसरपंच पदी कार्यरत होत्या
असे असताना अलीकडच्या काळात शेकापचे नेते आणि माजी उपसरपंच मधू ढेबे आणि शिंदे गटातील कार्यकर्ते आणि सदस्य यांच्यामध्ये खटके उडत असल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या त्याच्यामुळेच २१/८/२०२३ रोजी सरपंच तृषा अरविंद भगतसह एकूण शिंदे गटाच्या आठ सदस्यांनी तहसीलदार अलिबाग यांच्याकडे दया ढेबे यांच्या वर अविश्वास ठरावासाठी अर्ज केला

या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार अलिबाग कार्यालयाकडून सर्व सदस्यांना 28/08/2023 रोजी विशेष सभेसाठी नोटीस पाठविल्या आहेत ही सभा दुपारी 12.15 मिनिटांनी होईल अशी माहिती समोर येत आहे म्हणून येणाऱ्या सोमवारी विशेष सभेमध्ये दया ढेबे आपली काय बाजू मांडतात हे आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्यावर आलेला अविश्वास ठरावाला कशा पद्धतीने सामोऱ्या जातील हे पाहावे लागेल

Back to top button
Don`t copy text!