ताज्या घडामोडी

अवकाळी पावसामुळे अलिबाग-रायगड मधील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान

अलिबाग-रायगड

8 नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसामुळे अलिबाग-रायगड तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेली कित्येक वर्षे शेतकरी या समस्येने त्रस्त आहे ऐन कापणीच्या वेळी शेती कापली असताना दरवर्षी अवकाळी पाऊस पडतो आणि शेतीमध्ये पाणी तुंबून भाताचे नुकसान होते ह्या वर्षीही नेहमीप्रमाणे शेतकऱ्याने कापणी केली असता 8 तारखेला मुसळधार पाऊस झाला आणि शेती भिजली

गेली 4 वर्षे सतत अतिश गायकवाड संपादक AG MEDIA दर वर्षी शेतकऱ्यांच्या शेतात अवकाळी पावसामुळे शेती भिजून शेतात पाणी साचलेले असते तिथे जाऊन ग्राउंड रिपोर्टिंग करतो समंधित लोकप्रतिनिधी,शासन ह्यांच्या लक्षात आणून देतो पण शेतकऱ्यांना मदत मिळत नाही

आपण मोठ्या आशेने आमदार,निवडून देतो पण ते आमदार,आमदार झाल्यावर फक्त स्वतःच्या धुंदीतच मस्त असतात आपल्या मतदार संघातील जनतेला काय त्रास आहे याच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नसतं हे गेले चार वर्षे आपण पाहिलेल आहे यावर्षी तरी आमदार संबंधित शासन यंत्रणेला आदेश देऊन शेतकऱ्यांच्या भिजलेल्या भात शेतीचे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देतील अशी फक्त आपण आशा अपेक्षा बाळगू शकतो अजून काही नाही

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!