माहिती व तंत्रज्ञान

तलाठी यांना सज्जा मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढून दिले नवीन आदेश

प्रतिनिधी-अलिबाग

महसूल व वन विभाग यांचे शासन परिपत्रक दिनांक 18 ऑगस्ट 2023

तलाठी हे क्षेत्रीय स्तरावरील सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पद असून जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो तसेच शेतकऱ्यांशी निगडित पीक पाहण्याची ई-पिक पाहणी या मोबाईल ॲप द्वारे नोंदणी करणे,नुकसानीचे पंचनामे करणे,दुष्काळ,अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी मदत व पुनर्वसनाचे काम करणे यासाठी तलाठी हा अतिशय महत्त्वाचा दुवा आहे परंतु तलाठी सध्याच्या ठिकाणी उपस्थित रहात नसलेबाबत जनतेकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून वारंवार शासनास तक्रार वजा सूचना निवेदने प्राप्त होत असतात सद्यस्थितीत तलाठी संवर्गाची एकूण मंजूर पदे 15744 इतकी असून त्यापैकी 538 इतकी पदे रिक्त आहेत त्यामुळे एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जाचा कार्यभार सोपीवण्यात येतो फक्त रिक्त तलाठी पदांपैकी 4644 तलाठी पदे भरण्याच्या अनुषंगाने दिनांक 26/06/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तलाठ्यांना सज्जातील गावांना भेटी देणे पंचनामे स्थळ पाहणे वरिष्ठ कार्यालयाकडे असणाऱ्या बैठका राजशिष्टाचार पाहणे तसेच तपासण्या इत्यादी कामी उपस्थित राहावे लागते जास्त अपवादात्मक परिस्थितीत तलाठी यांना सज्जा मुख्यालयीन कार्यालयांमध्ये उपस्थित राहता येत नाही सबब एकापेक्षा जास्त गावाकरिता एकच तलाठी असल्याने तलाठ्यांनी जनतेस आवश्यक त्या सेवा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कार्यभार असलेल्या सज्जाच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी ठराविक वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे याकरिता यापूर्वी 6/1/2017 च्या शासनपत्रांनुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत परंतु प्राप्त परिस्थितीत रीक्त तलाठी पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवार उपलब्ध होईपर्यंत एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जांचा कार्यभार आहे तथापि जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरता सर्व तलाठी यांनी सध्याच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबतचे वेळापत्रक ग्रामपंचायत कार्यालय व अन्य शासकीय इमारतींवर लावण्याबाबत सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारा धनी होती त्या अनुषंगाने शासन खाली प्रमाणे सूचना निर्गमित करीत आहे

तलाठी संवर्गातील नियोजित भरती प्रक्रिया पार पडेपर्यंत संबंधित तलाठ्यांनी त्यांच्या नियोजित दौरा बैठक कार्यक्रम याबाबत तलाठी कार्यालय तसेच संबंधित गावच्या ग्रामपंचायत दर्शनी भागात दिसेल अशा पद्धतीने सूचना फलक आगाऊ वेळेत लावावा तलाठ्याने सज्जा कारण ठिकाणी उपस्थिती बाबत वेळापत्रक निश्चित करून सदर वेळापत्रक गावच्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात आगाऊ वेळेत लावावे तसेच सदर वेळापत्रक संबंधित मंडल अधिकारी व नायब तहसीलदार यांना देखील पाठवण्यात यावे तलाठ्याने कार्यालयाच्या दर्शनी भागात आपला दूरध्वनी क्रमांक ठलक दिसेल अशा स्वरूपात लावावा तसेच संबंधित सध्याचे मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांचे नाव दूरध्वनी सुद्धा दर्शनात यावे जनतेस कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!