ताज्या घडामोडी

भाजपमधील वाढती नाराजी सुनील तटकरे यांच्यासाठी धोकादायक

अलिबाग रायगड

18 व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुका 19,26 एप्रिल 7,13 ,20,25 मे आणि 1जून अशा सात टप्प्यात होणार असून 4 जून रोजी मतमोजणी असणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत 48 जागांवर महायुती एकत्र उमेदवार देणार आहे अशातच 32 रायगड लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला जाईल अशी सगळीकडे चर्चा होती परंतु सध्याचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी महायुतीला समर्थन दर्शवल्यामुळे रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणून त्यांना मिळालेली आहे आणि असे असताना ज्या शेतकरी कामगार पक्षाच्या माजी आमदाराने धैर्यशील दादाने मागील काही महिन्यापूर्वी शेकापला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता आणि लोकसभेची जागा ही आपल्याला मिळेल या अटी शर्तींवर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केलेला असावा सुनील तटकरे हे उमेदवार जाहीर होण्याअगोदर त्यांनी मीच रायगड लोकसभेचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे अशा पद्धतीने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता मेळावे घेतले आणि अचानक सुनील तटकरे हेच उमेदवार असतील अशी चर्चा रंगू लागली आणि धैर्यशील दादा पाटील यांना गप्प बसायला लागलं 2019 मध्ये शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अश्या आघाडी सरकार मधून सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळाली होती आणि शेतकरी कामगार पक्षाचे 2019 मध्ये आमदार असलेले धैर्यशील पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय जोमाने काम करून सुनील तटकरे यांना चांगली मते ही पेण विधानसभा मतदारसंघातून मिळवून दिलेली होती परंतु आपलं जेवणाच ताट हे सुनील तटकरे यांनी हिसकावून घेतल्यामुळे 2024 च्या लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना धैर्यशील पाटील मदत करणार नाहीत असंच एकंदरीत चित्र सध्या दिसत आहे सगळीकडे याच्या चर्चा होताना दिसत आहेत धैर्यशील दादा पाटील यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारल्यामुळे ते अतिशय शांत आणि गप्प झालेले आहेत परंतु दक्षिण रायगड भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याकारणाने महायुतीच्या एकत्र व्यासपीठावर पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सुनील तटकरे यांना मतदान करून विजयी करा अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी कडून बोलणारा नेता आता कोणी नाही आहे धैर्यशील दादा पाटील हे सुनील तटकरे यांच काम कदाचित करणार नाहीत हे आता निश्चित झालेल आहे म्हणून त्याचा फटका सुनील तटकरे यांना आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बसेल

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!