ताज्या घडामोडी
छोटंम शेठ(दिलीप भोईर) यांच्या हस्ते सातिर्जे अलिबाग जलजीवन मिशनचे भूमिपूजन

अलिबाग तालुक्यातील मापगाव जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सातिर्जे ग्रामपंचायत हद्दीत केंद्र शासन आणि राज्यशासन यांच्या अंतर्गत येणाऱ्या जलजीवन मिशनच्या योजनेचे भूमिपूजन छोटंम शेठ दिलीप भोईर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा (दक्षिण रायगड) पार पडले.
ही योजना आमलात आणण्यासाठी सरपंच प्राजक्ता खडपे (माई) यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता असे छोटंम शेठ म्हणाले सदर योजनेला ८१लक्ष ४४ हजार ९८९ रुपये निधी मंजूर झाले आहेत तसेच या योजनेमुळे सातिर्जे ग्रामपंचायत हद्दीतील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरेल असे पुढे शेठ म्हणाले.