१८ व्या लोकसभेच्या निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,भाजपा आणि शिंदे गट महायुती म्हणून एकत्र लढणार आहेत असे असताना रायगड 32 ची जागा भाजपा लढवेल असे एकंदरीत चित्र होते भाजपचे संभाव्य उमेदवार धैर्यशील पाटील यांनी बूथ कार्यकर्ता मेळावे घेत कंबर कसली होती त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती बहुधा त्या गर्दीचे महत्व लक्षात घेता आपण गाफील राहिलो तर आपल्याला उमेदवारी मिळणे कठीण जाईल म्हणून सुनील तटकरे यांनी आपले राजकीय वजन वापरत वरच्या नेत्यांचे कान भरले आणि प्रस्तावित मुरुड तालुक्यातील भाजपा बूथ कार्यकर्ता मेळावा अचानक रद्द झाला आणि धैर्यशील पाटील यांचं नाव गायब होऊन सुनील तटकरे यांचे नवा चर्चेत यायला सुरुवात झाली त्यामुळे साहजिकच भाजपावाले नाराज झाले भाजपचे रोहा तालुक्यातील महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी अलिबाग येथे एक पत्रकार परिषद घेत एक वेळ अनंत गितेना मतदान करा पण सुनील तटकरे यांना मतदान करू नका असे उघडपणे बोलून आपली भूमिका स्पष्ट केली सुनील तटकरे यांच्यावर ते जलसंपदा मंत्री असताना 76 हजार कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते,अचानक त्यांना मुस्लिम समाज जवळचा वाटायला लागलेला आहे, 1980 च्या दशकात त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती परंतु आज तटकरे 4 ते 5 कोटीच्या गाडीतून फिरतात एवढे बंगले एवढे संपत्ती त्यांच्याकडून आली कुठून? त्यांचा व्यवसाय तरी काय? असे प्रश्न त्यांनी पत्रकार परिषदेत मांडले
भाजपचे बबलू सय्यद यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवल्या नंतर लगेचच दोन दिवसानंतर माणगाव येथील शिंदे गटाचे नेते राजू साबळे यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेतली आणि रायगड मध्ये आमच्या शिंदे गटाचे तीन आमदार आहेत म्हणून रायगडची लोकसभा जागा लढवण्यासाठी मी इच्छुक आहे मी सुद्धा चार वेळा वेगवेगळ्या मतदार संघातून जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवलेल्या आहेत म्हणून रायगड लोकसभा जागेवर आमचा हक्क आहे.
अगोदरच 2 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडून भाजप आणि शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला आणि सुनील तटकरे हे सुद्धा अजित पवार यांच्यासोबत गेले म्हणून शरद पवार यांना फसवल्यामुळे जनता अगोदरच सुनील तटकरे यांच्यावर नाराज आहे आणि त्याच्यामध्ये महायुती मधील त्यांचे घटक पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घ्यायला लागले आहेत म्हणून सुनील तटकरे यांना आगामी लोकसभा निवडणूक अतिशय कठीण जाईल याच्यामध्ये काही शंकानाही
तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या मदतीने 2019 मध्ये खासदार म्हणून निवडून आलेले सुनील तटकरे यांना शेकापच्या नाराजीचा सुद्धा फटका बसणार आहे आमदार जयंत पाटील हे बदला घेण्यासाठी तयार आहेत कारण वारंवार ते त्यांच्या भाषणांमधून बदला घेणार बदला घेणार अशी आपली भूमिका स्पष्टपणे सुनील तटकरे यांच्या विरोधात मांडत असतात आता घोडा मैदान काही जास्त लांब नाही लवकरच रायगडचा खासदार कोण होईल? हे आपल्याला समजेलच
Back to top button
Don`t copy text!