18 मार्च रोजी शेतकरी कामगार पक्षाला मुरुड तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांनी मोठा धक्का दिला होता शेकापचे मुरुड तालुका सरचिटणीस अजित कासार,आणि रायगड जिल्हा उप चिटणीस मनोज भगत,माजी सरपंच मनीष नांदगावकर,संतोष कांबळी,मनोहर पानवलकर,सचिन पाटील,विकास दिवेकर,आगरदंडा उपसरपंच संतोष पाटील,मनोहर मेहत्तर माजी सभापती बाबू नागावकर,माजी सभापती किशोर धामणसकर,जयंत कासार,भाई मयेकर,ऋत्विज मकु असंख्य कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीसाठी ही धोक्याची घंटा आहे हे मात्र निश्चित आहे
पक्ष प्रवेशावेळी व्यासपीठावरून भाषण करताना शेकापचे रायगड जिल्हा उपचिटणीस यांनी मनोज भगत यांनी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पक्षातील वारंवार हस्तक्षेपामुळे पक्ष सोडला असा आरोप केला चित्रलेखा पाटील ह्या काही मोजक्या युवकांना सोबत घेऊन काम करतात आणि वरिष्ठांना डावलतात असा आरोप त्यांनी केला अनेक डिजिटल माध्यमांनी ह्या बातम्या आपल्या चॅनलवर सुद्धा प्रसारित केल्या चित्रलेखा पाटील याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया देतील अस वाटलं होत पण त्यांनी मौन बाळगण पसंत केलं
परंतु काल रात्री चिऊ ताई यांनी मुरुड तालुक्याचा दौरा करून आपल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या




आपल्या पक्षाला 18 मार्चच्या पक्ष प्रवेशामुळे किती नुकसान झाले आहे याचा कदाचित त्यांनी कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला असेल
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि चित्रलेखा पाटील या शेकाप आणि इंडिया आघाडी कडून उमेदवार असू शकतात म्हणून हा पक्षप्रवेश चित्रलेखा पाटील यांच्यासाठी धोकादायक असणार आहे
Back to top button
Don`t copy text!