
धैर्यशील पाटील यांची दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून फेर निवड भारतीय जनता पार्टीचा दक्षिण रायगडचा अध्यक्ष कोण होणार म्हणून जिल्हयात सगळीकडे चर्चा होती मागच्या आठवड्यात भाजपच्या बैठकीत अलिबाग तालुक्यात तीन मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली त्या बैठकीत दक्षिण रायगडचे लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप जिल्हाध्यक्ष होतील असं बोलल जात होत पण आज अचानक धैर्यशील पाटील यांची पुन्हा फेर निवड करण्यात आली त्यामुळे अनेक इच्छुकांचे स्वप्न भंगले




