भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ भारतीय जनता पार्टी मधून राजीनामा देणार नाहीत
रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गटाचा महिला मेळावा कुर्डूस-अलिबाग येथे आयोजित केला होता कुर्डूस हा जिल्हा परिषद मतदार संघ शिवसेना शिंदे गटाचे रायगडचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांचा आहे.त्या मेळाव्यात राजा केणी यांनी दक्षिण रायगडचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर उर्फ छोटंम शेठ यांची दोन दिवसात पक्षातून हकालपट्टी होईल असे विधान केले होते.त्यामुळे अलिबाग मुरुड मतदार संघातील सर्वांच्या नजरा ह्या दोन दिवसानंतर काय होणार आहे याच्यावर लागल्या होत्या परंतु आज 10 ऑक्टोबर आहे तरीसुद्धा छोटंम शेठ यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केलेली नाही आहे.
राजा केणी यांच्या वक्तव्यानंतर लगेचच लोकांमध्ये चर्चा व्हायला लागल्या की दिलीप भोईर हे दोन दिवसात भारतीय जनता पार्टी मधून राजीनामा देतील पण तसेही काही झाले नाही म्हणून आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी AG MEDIA चे मुख्य संपादक अतिश गायकवाड यांनी दिलीप भोईर यांच्याशी संपर्क साधून खरं काय खोटं काय हे जाणून घेतल आहे त्यावेळी आतिश गायकवाड यांच्याशी बोलताना दिलीप भोईर यांनी सांगितलं की अशा कुठल्याही पद्धतीचा राजीनामा मी पक्षातून देणार नाही आहे या फक्त आणि फक्त अफवा आहेत त्याच्यामुळे दिलीप भोईर यांची पक्षातून हकालपट्टी होईल आणि दिलीप भोईर राजीनामा देतील या बातमीला तूर्तास तरी पूर्णविराम लागलेला आहे
Back to top button
Don`t copy text!