अजित पवार गटाचे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेते सुधाकर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत रॉयल गार्डन येथे सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी कर्जतचा पुढील आमदार मीच असेन अशी त्यांनी ग्वाही दिली.
या सभेमध्ये पुढील मार्गदर्शन करताना अजित पवार गटाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे यांनी महाडचे शिवसेना-शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. राज्यात 2019 मध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे महाविकास आघाडीचे सरकार होतं.असे असताना देखील रायगड मध्ये शिवसेनेचे तीन आमदार आणि भाजपचे दोन आमदार असून सुद्धा फक्त राष्ट्रवादीच्या एक आमदार असलेल्या सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांच्या गळ्यात राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ पडली होती म्हणून आमदार भरतशेठ गोगावले(महाड) महेंद्र थोरवे(कर्जत) महेंद्र दळवी(अलिबाग) यांनी पालकमंत्री हटाव ही मोहीम हाती घेतली होती महाविकास आघाडीमध्ये सत्तेत असताना सुद्धा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात हे तीन आमदार वारंवार टीका करत होते
पुढे जुलै 2022 मध्ये शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि 40 आमदारांसह भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट असे सरकार स्थापन केले. त्या गोष्टीला एक वर्ष होत असतानाच अजित पवार हे देखील राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकून 2 जुलै 2023 रोजी शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि त्यांची कन्या आदिती तटकरे हे दोघे सुद्धा शिंदे, भाजप सरकार सोबत गेले
दिनांक 20/8/2023 रोजी कर्जत रॉयल गार्डन येथे झालेल्या सभेमध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादी रायगड जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे यांनी लहान मुलींनी पालकमंत्री पद पण मिळून दिले नाही अशी अप्रत्यक्षपणे भरत गोगावले यांच्यावर टीका केली
तसेच मागील काही महिन्यापूर्वी शिवसेना-शिंदे आणि भाजप यांचे सरकार असताना आमदार महेंद्र थोरवे(कर्जत) यांनी माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावर शेंबडी पोर अशी टीका केली होती ती पुन्हा कॅबिनेट मंत्री झाली आहे बाप तो बापच असतो असा पलटवार आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर हनुमंत पिंगळे यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे
अजित पवार यांनी बंड करून शिवसेना-शिंदे आणि भाजप सरकार मध्ये जाऊन एक महिनाही झाला नाही आणि लगेचच रायगड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेच्या (शिंदे) आमदारांमध्ये शीतयुद्ध सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे.
Back to top button
Don`t copy text!