मयुरेश गंभीर शिवसेना-शिंदे जिल्हा संघटक रायगड याला दोन खून केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे मयुरेश गंभीर हा अलिबाग मुरुड मतदार संघातील आमदार महेंद्र दळवी शिवसेना शिंदे यांचा निकवर्तीय होता? काय आहे नक्की प्रकरण आरोपी मयुरेश गंभीर याने त्याची दुसरी पत्नी प्रीती हीची ऑगस्ट २०२२ रोजी अलिबाग तालुक्यातील नागाव वाळंज पारोडा इथे असणाऱ्या साज व्हीला या हॉटेलमध्ये गळा दाबून हत्या केली होती.मयुरेश गंभीर सह दीपक गुजुळेकर,दीपक उर्फ बाबू निषाद,अकबर शेख अशी गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत.या तीन जणांनी प्रीतीचा मृतदेह वडखळ येथील धरमतर खाडी मध्ये टाकून पुरावा नष्ट केला.तपास कसा लागला १० जुलै २०२३ रोजी उरण तालुक्यातील पिरकोन-सारडे गावातील रस्त्यावर एक महिला मृतावस्थेत आढळली होती.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना तिथे चष्म्याचे कव्हर सापडले.त्यावरून पोलिसांना मृत महिला भारती आंबोरकर यांची ओळख पटली.ही महिला आरोपी मयुरेश गंभीर याची सासू आहे हे तपासात निष्पन्न झाले.९ जुलै २०२३ रोजी जावई मयुरेश गंभीर याने सासू मयत भारती आंबोरकर यांना अलिबाग मधील पोयानाड येथे भेटायला बोलावले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी आरोपी मयुरेश गंभीर याला डोंबिवली पूर्वेकडील पलावा भागातून उचललं.चौकशी दरम्यान मयुरेश गंभीर यांनी आपणच आपल्या सासूबाई याची हत्या केली असल्याचं कबूल केलं सोबत तीन साथीदारांच्या मदतीने आपल्याच गाडीत डोक्यात २ गोळ्या घातल्या आणि मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिला.तसेच त्यांनी आपली दुसरी पत्नी प्रीती हीचाही गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली.२०१४ मध्ये एका गुन्ह्यात सजा झाल्याने तुरुंगात जाण्याअगोदर ९ लाख रुपये पत्नी प्रीतीला दिले होते तुरुंगातून सुटून आल्यावर पैशाची मागणी केली असता तिने नकार दिला म्हणून तिचा काटा काढला आणि प्रितीच्या हत्या प्रकरणात सासू फिर्यादी होती म्हणून तिची पण हत्या केली
Back to top button
Don`t copy text!