ग्रामीण
Trending
उमटे (अलिबाग) धरणातून एक दिवस आड पाणी नागरिकांचे हाल
उमटे (अलिबाग) धरणातून एक दिवस आड पाणी नागरिकांचे हाल

अलिबाग-रायगड
आलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून ५० ते ६० गावांना पाणीपुरवठा होतो.उमटे धरण १९७८ च्या आसपास बांधले आहे.एकेकाळी संपूर्ण अलिबागला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची अवस्था आज बिकट आहे.धरण बांधल्यापासून आजपर्यंत धरणाचा गाळ काढला गेला नसल्या कारणाने संपूर्ण धरण मातीने भरले आहे.
गेल्या वर्षी उमटे धरणातील पाणी पूर्ण संपल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.म्हणून पाणीपुरवठा विभाग रायगड यांनी डिसेंबर ते जानेवारी मध्येच पाणी एकदिवस आड करून सोडायला सुरुवात केली आहे त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.पण एकही लोकप्रतिनिधी ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत नाही