ताज्या घडामोडी

सुनील तटकरे शेकापला फोडण्यात यशस्वी

अलिबाग-रायगड

2024 मध्ये भारतामध्ये 18 व्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत त्यापैकी रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे 2019 मध्ये शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या आघाडीतून निवडणूक लढवून अनंत गीते यांना पराभूत करून जिंकलेले होते

लोकसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये शिवसेना भाजप यांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालेल होत परंतु अस असताना अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये फारकत झाली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे विरोधी पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन केलं परंतु महाविकास आघाडीमध्ये असलेला घटक पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाच्या मदतीने खासदार झालेले सुनील तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाला हळूहळू डावलायला सुरुवात केली सत्तेमध्ये असताना स्वतःची मुलगी आदिती तटकरे महाराष्ट्र राज्यांमध्ये राज्यमंत्री असताना रायगड जिल्ह्याची पालकमंत्री असताना शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना विकास कामे मिळालीच नाही त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्यामध्ये आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये वैर वाढत गेलं आणि शेतकरी कामगार पक्षाने उघडपणे जाहीरपणे सुनील तटकरे यांना विरोध करायला सुरुवात केली आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण सुनील तटकरे यांना पराभूत करून त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे जाहीरपणे उघडपणे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी त्यांच्या मनातील खदखद वारंवार बोलून दाखवली

2 जुलै 2024 रोजी अजित पवारांसह सुनील तटकरे शिंदे,भाजपा सरकारमध्ये सामील झाले आणि त्याच्यानंतर जाहीर झालेल्या 2024 च्या निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार म्हणून महायुतीतून सुनील तटकरे यांना रायगड लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे आणि महाविकास आघाडी मधून अनंत गीते यांना उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यामुळे साहजिकच भाजपची विचारधारा न मानणारा शेतकरी कामगार पक्ष हा अनंत गीते यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे आणि शेतकरी कामगार पक्ष हा सुनील तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत जो काही विश्वासघात केलेला आहे त्याचा वचपा त्यांना पराभूत करून काढेल असं जयंत पाटील यांचा म्हणणं आहे

मात्र निवडणूक तोंडावर असताना सुनील तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्ह्याचे सहचिटणीस मनोज भगत मुरुड तालुका चिटणीस अजित कासार यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यांचा 19 मार्च 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला तसेच 20 एप्रिल 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस मधून शेतकरी कामगार पक्षामध्ये आलेले नंदूशेठ म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य रायगड, लक्ष्मण महाले माजी सभापती रोहा यांनी पुन्हा एकदा 2 एप्रिल 2024 रोजी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे एकापाठोपाठ एक असे दोन मोठे हादरे सुनील तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील यांना दिलेले आहेत म्हणून शेतकरी कामगार पक्षाला फोडण्यात सुनील तटकरे यांना यश आलेल आहे आणि कशाप्रकारे भाई जयंत पाटील हे 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांना हरवणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण शेतकरी कामगार पक्षाचे कधीही न फुटणारे कार्यकर्ते मतदार पदाधिकारी अशा पद्धतीने पक्षाला सोडून जात आहेत म्हणून भाई जयंत पाटील हे अनंत गीते  कशा पद्धतीने निवडून आणू शकतात? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे पण सुनील तटकरे हे त्यांच्या रणनीतीमध्ये यशस्वी झालेले आहेत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!