ग्रुप ग्रामपंचायत बोरघर हद्दीतील उमटे धरणातून संपूर्ण रामराज विभागाला पाणीपुरवठा होत असतो परंतु गेली कित्येक वर्षे उमटे धरणाचा गाळ न काढल्यामुळे सध्या परिस्थितीत उमटे धरणातून नागरिकांना तीन दिवस आड करून पाणी येत आहे त्याच्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत ही बाब मी स्वतः कावीर जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळी यांच्या निदर्शनास आणून दिली अनंत गोंधळी हे स्वतः पंचायत समितीचे BDO यांच्याशी त्याबाबतीत बोलले
अलिबागच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत मधून मागणी पत्र आणि ठराव या दोन गोष्टी आम्हाला द्याव्या त्याच्यानंतर आम्ही टॅंकरने पाणीपुरवठा करू असे आश्वासन दिले आहे त्यानुसार ग्रामपंचायतीने पंचायत समिती अलिबाग यांना मागणी पत्र आणि ठराव दिला आहे