अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ धरण बांधल्यापासून गेली ४० वर्षाहून अधिक काल होऊन गेलेला आहे तरी गाळ काढला गेलेला नाही त्याच्यामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झालेली आहे परिणामी उमटे धरणातून एप्रिल महिन्यापासून पाणी कपातीला सुरुवात होते आणि नागरिकांचे प्रचंड हाल होतात उमटे धरण रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते गेली चार वर्ष रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या रायगड जिल्हा परिषदेचे कामकाज प्रशासकाच्या मार्फत चालत होते परंतु नुकत्याच फेब्रुवारी २०२६ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि नव्याने शिंदे गटाचे अनंत गोंधळी हे उमटे धरण ज्या कावीर जिल्हा परिषद गटाच्या हद्दीमध्ये येते त्याचे नवनिर्वाचित सदस्य झाले आहेत १५ मे रोजी स्वतः अनंत गोंधळी,रायगड जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता यांच्या सोबत उमटे धरणाची पाहणी करायला गेलेले होते उमटे धरणातून गाळ काढला तर उमटे धरण फुटू शकते अशा सगळीकडे अफवा पसरवल्या जात होत्या परंतु स्वतः कार्यकारी अभियंता यांनी पाहणी करून स्पष्टपणे सांगितले आहे की जरी उमटे धरणातून गाळ काढला तरी धरणाला कोणताही धोका नाही आहे तसेच धरणाच्या डागडुगी साठी साडेसहा कोटी रुपयाचा निधी शासनाकडून मंजूर झालेला आहे हे सुद्धा त्यांनी तिथे नमूद केले आणि धरणातील गाळ काढण्यासाठी अनंत गोंधळी यांना निधीची आवश्यकता आहे अशी मागणी केली अनंत गोंधळी यांनी धरणातील गाळ काढण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देऊ अशी त्यावेळेला ग्वाही दिली